त्या भारावलेल्या सायंकाळी
मनातील उमलली कळी
सुटल्या मनोशब्द झळी
असंख्य पडले त्यांसी बळी ….
त्या भारावलेल्या सायंकाळी
मी मना हळूच विचारले
बालपण माझे कसे सरले
मन माझे मलाच विसरले …
त्या भारावलेल्या सायंकाळी
अश्रू आले माझ्या नयनी
त्या स्वरुपात आठवणी
गेल्या टपटप वाहुनी ….
त्या भारावलेल्या सायंकाळी
झुळूझुळू वाहे वारा
मनी माझ्या साठवूनी सारा
केला त्याने पसारा ….
त्या भारावलेल्या सायंकाळी
हळूच एक चांदणी आली
संध्यासमय तेथेच सरली
नि घरी पोहचता रात्र झाली ….
~ चेतना चौधरी
मनातील उमलली कळी
सुटल्या मनोशब्द झळी
असंख्य पडले त्यांसी बळी ….
त्या भारावलेल्या सायंकाळी
मी मना हळूच विचारले
बालपण माझे कसे सरले
मन माझे मलाच विसरले …
त्या भारावलेल्या सायंकाळी
अश्रू आले माझ्या नयनी
त्या स्वरुपात आठवणी
गेल्या टपटप वाहुनी ….
त्या भारावलेल्या सायंकाळी
झुळूझुळू वाहे वारा
मनी माझ्या साठवूनी सारा
केला त्याने पसारा ….
त्या भारावलेल्या सायंकाळी
हळूच एक चांदणी आली
संध्यासमय तेथेच सरली
नि घरी पोहचता रात्र झाली ….
~ चेतना चौधरी
No comments:
Post a Comment