या अफाट नभातील
मी एक विरहपक्षी
स्वप्न माझे एकच
भरारेन उंच आकाशी …
माझ्या त्या व्यथेतून
सुख कथा लिहिणार मी
तुझ्या त्या आठवणींनाच
काव्य शब्दांत मांडणार मी ….
या अवघ्या विश्वात मजला
नाही कुणीही सोबती
अंत समय येता बघता
भावनाच फक्त हाती असती ….
माझ्या या नभात
वैविध विहग खेळती
पण माझा दर्शून
मजला ते दूर करती ….
माझ्या या दु:खातील
ऐके न कुणी आर्तता
सर्व मजला बघून नेहमी
दाखवतात स्वतःची धूर्तता ….
~ चेतना चौधरी
मी एक विरहपक्षी
स्वप्न माझे एकच
भरारेन उंच आकाशी …
माझ्या त्या व्यथेतून
सुख कथा लिहिणार मी
तुझ्या त्या आठवणींनाच
काव्य शब्दांत मांडणार मी ….
या अवघ्या विश्वात मजला
नाही कुणीही सोबती
अंत समय येता बघता
भावनाच फक्त हाती असती ….
माझ्या या नभात
वैविध विहग खेळती
पण माझा दर्शून
मजला ते दूर करती ….
माझ्या या दु:खातील
ऐके न कुणी आर्तता
सर्व मजला बघून नेहमी
दाखवतात स्वतःची धूर्तता ….
~ चेतना चौधरी