बालपणीच्या आठवणी
हृदयात ठेवल्या साठवूनी
तरी त्या वास्तव्यात
कधी न येती परतुनी …
गाल सुंदर मखमली
ओठांवरती लाल लाली
डोळ्यांमध्ये काजळ काळी ….
मनासारखे सगळेकाही
न शिकवायला असत बाई
अभ्यासाची कटकट नाही …
हृदयात ठेवल्या साठवूनी
तरी त्या वास्तव्यात
कधी न येती परतुनी …
बालपणीच्या आठवणी
त्यांतील ती बोबडगाणी
खेळामधले राजाराणी
आणि ती हाणाहाणी ….
बालपणीच्या आठवणीगाल सुंदर मखमली
ओठांवरती लाल लाली
डोळ्यांमध्ये काजळ काळी ….
बालपणीच्या आठवणी
मन कसे स्वच्छंदी
परिसर असे आनंदी
मनी एक वेगळीच धुंदी ….
बालपणीच्या आठवणीमनासारखे सगळेकाही
न शिकवायला असत बाई
अभ्यासाची कटकट नाही …
बालपणीच्या आठवणी
हळूहळू विसरले कुणी
ज्यांनी जपुनी ठेवल्या मनी
त्यांना त्यात वाटेच कमी ….
~ चेतना चौधरी
No comments:
Post a Comment