एकदा माझ्या स्वप्ननगरीत
आली एक परी
मला म्हणाली चल राणी
जाऊ माझ्या घरी ….
तिच्या घरी जातांना
वाटेत लागली सुवर्णदरी
दरी ओलांडता पडू लागल्या
हिऱ्या माणिकांच्या सरी …
अशा प्रकारे मी शिरले
तिच्या त्या अदभूत विश्वात
हळूच काही आठवणी मी
जपून घेतल्या माझ्या खिशात ….
तेथे पोहचता तिने
एक छडी हाती घेतली
आणि मग तिने ती
माझ्यावरी गोल फिरवली ….
आणि पाहता तर काय
मी परी झाली
तितक्यात मला हळूच
आईची साद आली ….
डोळे उघडता मला दिसली
मी माझ्या भूवरी
कारण तेवढयात लुप्त झाली
होती माझी स्वप्ननगरी ….
~ चेतना चौधरी
आली एक परी
मला म्हणाली चल राणी
जाऊ माझ्या घरी ….
तिच्या घरी जातांना
वाटेत लागली सुवर्णदरी
दरी ओलांडता पडू लागल्या
हिऱ्या माणिकांच्या सरी …
अशा प्रकारे मी शिरले
तिच्या त्या अदभूत विश्वात
हळूच काही आठवणी मी
जपून घेतल्या माझ्या खिशात ….
तेथे पोहचता तिने
एक छडी हाती घेतली
आणि मग तिने ती
माझ्यावरी गोल फिरवली ….
आणि पाहता तर काय
मी परी झाली
तितक्यात मला हळूच
आईची साद आली ….
डोळे उघडता मला दिसली
मी माझ्या भूवरी
कारण तेवढयात लुप्त झाली
होती माझी स्वप्ननगरी ….
~ चेतना चौधरी
No comments:
Post a Comment