आकांक्षांच्या पक्ष्यांना
उंच भरारण्याची शक्ति दे
हृदयातील भावनांना
समोर मांडण्याची शक्ति दे ....
सोबत धरूनी काट्यांना
जीवन जगण्याचा गुलाब दे
मनातील विचारांना
एक देखणा रुबाब दे ....
मनातील गोंधळांना
तूच एक वाट दे
परीक्षा माझी घेतांना
तूच कठीण घाट दे …
तिमिराच्या वाटेतून येतांना
तूच दिनकराचा किरण दे
काटेरी वाटेत वावरतांना
तूच भक्कम चरण दे …
करण्यासाठी दान इतरांना
तूच विशाल कर दे
तुझ्या या भक्तांना
तुझ्या स्वर्गात घर दे …
हे करुणाकरा, हे अनंता
तू माझी भक्ती घे
पण मज देतांना
या साऱ्या शक्ती दे …
~ चेतना चौधरी
उंच भरारण्याची शक्ति दे
हृदयातील भावनांना
समोर मांडण्याची शक्ति दे ....
सोबत धरूनी काट्यांना
जीवन जगण्याचा गुलाब दे
मनातील विचारांना
एक देखणा रुबाब दे ....
मनातील गोंधळांना
तूच एक वाट दे
परीक्षा माझी घेतांना
तूच कठीण घाट दे …
तिमिराच्या वाटेतून येतांना
तूच दिनकराचा किरण दे
काटेरी वाटेत वावरतांना
तूच भक्कम चरण दे …
करण्यासाठी दान इतरांना
तूच विशाल कर दे
तुझ्या या भक्तांना
तुझ्या स्वर्गात घर दे …
हे करुणाकरा, हे अनंता
तू माझी भक्ती घे
पण मज देतांना
या साऱ्या शक्ती दे …
~ चेतना चौधरी
No comments:
Post a Comment