घेऊनी सुख दु:खाची फुले
मी विनला एक गजरा
माझ्याच त्या आठवणींचा
सुगंध तो देतो मजला ....
या गजर्या तील प्रफुल्लितता
मज बनवी उत्साही
या गजर्या वीणा
मजला उमजे ना काही ...
या गजर्या तील सुखी फुले
मजला देती आनंद
या गजर्या तील दु:खी फुले
मजला देती नवीन पंथ ...
या गजर्याने मला शिकविले
कसे करावे कार्य
तेव्हा जाऊनि मजला कळले
या गजर्या तील गांभीर्य ...
या गजर्या तील आठवणी
मना हिंडोळे देती
या गजर्या तील विविधवरणी
फुले मना भाती ...
~ चेतना चौधरी
~ चेतना चौधरी
No comments:
Post a Comment