आठवणींच्या सह्याद्रीवर
एकटीच मी होती उभी
सोबत मला देत होत्या
फक्त आणि फक्त तुझ्याच आठवणी.
या आठवणींच्या शिखरावर
मुक्त विहारत होते मी
सोबत मला देत होत्या
फक्त आणि फक्त तुझ्याच आठवणी.
खूप खूप घाबरली मी
शिखरावर पोहचताच क्षणी
तरी धीर मला देत होत्या
फक्त आणि फक्त तुझ्याच आठवणी.
~ चेतना चौधरी
~ चेतना चौधरी
No comments:
Post a Comment