श्रावणातल्या जलधारांनी
धरती चिंब हि होई
नव्या पिकांना, नव्या तरुंना
जन्म ही ती देई …
मिळे तप्त मना थंडाई
या सुखाच्या आनंदाने
पाखरे गाणे गाई …
श्रावण सरींतून होई
चराचरांना आनंदुनी
श्रावण सरी घेत बिदाई …
धरती चिंब हि होई
नव्या पिकांना, नव्या तरुंना
जन्म ही ती देई …
इंद्रधनुंचा खेळ आकाशी
मना मोहुनी जाई
कठोर हृदयांना पालवी
हा खेळ पाहुनी येई ….
श्रावणातल्या गारव्याने मिळे तप्त मना थंडाई
या सुखाच्या आनंदाने
पाखरे गाणे गाई …
तहानलेली माती काळी
या पाण्याने संतुष्ट होई
घाम गाळुनी या मातीवर
मजदुरा मिळे कमाई …
हिरव्या रंगाची ही बरसात श्रावण सरींतून होई
चराचरांना आनंदुनी
श्रावण सरी घेत बिदाई …
असा बहुरंगी आनंद
दिसे सर्वांच्या ठाई
अशा कृतींतून निसर्ग
गाई विविध अंगाई ….
~ चेतना चौधरी
No comments:
Post a Comment