स्री म्हणजे काय ?
तर ममतेचा झरा
त्याचे शितलजल करी
प्रत्येक रोग बरा ….
स्री म्हणजे काय ?
तर वात्सल्याचा आगर
प्रत्येक हृदयात सामावलेल्या
प्रेमाचा ती सागर ….
स्री म्हणजे काय ?
तर देवांचा स्वर्ग
दिशाभूल झालेल्या
मानवाचा मार्ग ….
स्री म्हणजे काय ?
तर तीमिरातील दिवा
सदगुणांची साखर व्यापित
तोच गोड खवा ….
स्री म्हणजे काय ?
तर सृष्टिची सुंदरता
आणिक पुष्प परागातील
मकरंदाची मधुरता ….
~ चेतना चौधरी
No comments:
Post a Comment