सणासुदींच्या बरसातीत
ओलावा घेऊनी आली
आनंदाच्या वर्षावात
आगमन स्वीकारी दिवाळी ….
वैफल्यातही सुखाचा
अनुभव जाणवाया आली
प्रसन्नता, उत्साह, कौशल्यता
गुणांची पारख झाली ….
दिव्यांच्या लखलखाटाची
ऋषीमुनींनी महती गायिली
भव्य उज्वल यशाची
सुचना घेऊनि आली ….
तमातुनी प्रकाशाची
वाट होई खुली
जणू पुर्वजांनी पुण्याई
ठेवा म्हणुनी दिली ….
फटाक्यांची महोग्र
साद परिसरी घुमली
तशी गोड मिष्ठांनानी
मनावर मोहिनी टाकली ….
अशाप्रकारे दिवाळीची
धुमधाम फार उडाली
बालहास्य शाळेची
सुट्टी देखील संपली ….
~ चेतना चौधरी
ओलावा घेऊनी आली
आनंदाच्या वर्षावात
आगमन स्वीकारी दिवाळी ….
वैफल्यातही सुखाचा
अनुभव जाणवाया आली
प्रसन्नता, उत्साह, कौशल्यता
गुणांची पारख झाली ….
दिव्यांच्या लखलखाटाची
ऋषीमुनींनी महती गायिली
भव्य उज्वल यशाची
सुचना घेऊनि आली ….
तमातुनी प्रकाशाची
वाट होई खुली
जणू पुर्वजांनी पुण्याई
ठेवा म्हणुनी दिली ….
फटाक्यांची महोग्र
साद परिसरी घुमली
तशी गोड मिष्ठांनानी
मनावर मोहिनी टाकली ….
अशाप्रकारे दिवाळीची
धुमधाम फार उडाली
बालहास्य शाळेची
सुट्टी देखील संपली ….
~ चेतना चौधरी