पौर्णिमेच्या शुभ्र रात्री
असंख्य चांदण्या नभी येती
येउनी नभी जीवनाच्या
आठवणींना उजाळा देती ….
अंधारलेल्या मनांत हि
हळूच शीतल किरण पाडती
गोल गोल चंद्राला
हळूच गुदगुल्या करती …
प्रफुल्लीत होऊन चंद्र मग
त्यांना देई हळूच चुंबन
त्याचे चुंबन स्वीकारुनी
करती त्या त्याला वंदन …
अशा प्रकारे खेळाखेळांत
पुनमरात्र सरून जाते
आणि हळूच सूर्यकिरण पडून
दुसऱ्या दिवसाची पहाट होते ….
~ चेतना चौधरी
असंख्य चांदण्या नभी येती
येउनी नभी जीवनाच्या
आठवणींना उजाळा देती ….
अंधारलेल्या मनांत हि
हळूच शीतल किरण पाडती
गोल गोल चंद्राला
हळूच गुदगुल्या करती …
प्रफुल्लीत होऊन चंद्र मग
त्यांना देई हळूच चुंबन
त्याचे चुंबन स्वीकारुनी
करती त्या त्याला वंदन …
अशा प्रकारे खेळाखेळांत
पुनमरात्र सरून जाते
आणि हळूच सूर्यकिरण पडून
दुसऱ्या दिवसाची पहाट होते ….
~ चेतना चौधरी
No comments:
Post a Comment