गणिताच्या तासाला चाले वादळ
विविध तऱ्हेच्या सूत्रांचे
तरी तशा त्या वातावरणात
आगमन होई झोपेचे …
रात्रीच्या शांत वातावरणी
मनी वारे विचारांचे
तरी त्या विचारबागेतही
आगमन होई झोपेचे …
सकाळच्या वेळी चाले
भांडण वेगवेगळ्या खेळांचे
तश्या त्या गडबडीतही
आगमन होई झोपेचे …
महिन्याच्या शेवटी दणक्यात
येई वाजंत्री पेपरची
तरी त्या वाज्यातही
आगमन होई झोपेचे …
आयुष्याच्या अंत समयी
उरी विचार आजारांचे
तरी त्या मृत्युद्वारावारी
हळूच आगमन झोपेचे ….
~ चेतना चौधरी
विविध तऱ्हेच्या सूत्रांचे
तरी तशा त्या वातावरणात
आगमन होई झोपेचे …
रात्रीच्या शांत वातावरणी
मनी वारे विचारांचे
तरी त्या विचारबागेतही
आगमन होई झोपेचे …
सकाळच्या वेळी चाले
भांडण वेगवेगळ्या खेळांचे
तश्या त्या गडबडीतही
आगमन होई झोपेचे …
महिन्याच्या शेवटी दणक्यात
येई वाजंत्री पेपरची
तरी त्या वाज्यातही
आगमन होई झोपेचे …
आयुष्याच्या अंत समयी
उरी विचार आजारांचे
तरी त्या मृत्युद्वारावारी
हळूच आगमन झोपेचे ….
~ चेतना चौधरी
No comments:
Post a Comment