जगात नसतो कुणी कुणाचा
फक्त असतो एक साचा
जय जय होतो पैशाचा
लहानांना म्हणे पुस्तके वाचा ….
द्वेष करा सदा पापाचा
नका करू अपमान देवाचा
सर्व काही बघतो वरचा
तोच पाहुणा आपुल्या घरचा ….
देवानेच केला वध कंसाचा
विचार करा आधी स्वतःचा
नाहीतर देवासमोर नाचा
त्यास शोधाया उंच टाचा ….
मार्ग दाखवितो तो यशाचा
तोच गुरु असे विद्येचा
तोच प्रमुख सद्धर्माचा
अधिष्टाता तो अपुल्या कर्माचा ….
सदैव ध्यानी असावा ऋणांचा
भान राहू द्यावा तृणांचा
विचार करावा अन्य मनांचा
आनंद मनी असावा सणांचा ….
~ चेतना चौधरी
~ चेतना चौधरी
No comments:
Post a Comment