माझ्या दु:ख नभातला
तो सुखाचा चंद्र
मला दुखी पाहुनी
गालात हसे मंद …
जरी माझ्या दु:ख नभी
अमावस्येला त्याची कमी
तरी पुनम रात्री
नेहमीच असे त्याची हमी ….
वंचित करून कठोरतेपासून
तो मला देई शीतलता
माझ्या दुखी दिवसांतही
तोच घालवी अबोलता ….
होता होता मी मोठी
चंद्राची चांदणी झाली
माझ्या जीवनी दु:ख देउनि
ती तेथे नभात विरली ….
~ चेतना चौधरी
No comments:
Post a Comment