एकदा मजला सहज सुचले
टाकावे शब्दपटलावरी हे मानसरंग
मांडायला बसले असता मनी
थैमान करीत होते विचारतरंग ।।
माझ्या त्या विचारांतील स्वप्नाळू मासोळी
सांगू इच्छित होती मजला काहीशी
हवेत उंच भरारी घेऊन
जलाशयात होत होती नाहीशी ।।
माझ्या अंतर्मनाच्या सरितेला
हवी होती एकच वाट
जिच्या प्राप्तीसाठी ती
उसळत होती उंचच लाट ।।
पण माझ्या मानसतरंगांना
हळूच केले येथे बंद
ज्यांच्या निरस वातावरणी
मरून पडले मनातील कंद ।।
आता माझ्या मानसतरंगांची
मनीच होत आहे दगदग
मात्र तुम्हा अपरिचित राहील
माझ्या अग्निपंखांतील तगमग ।।
~ चेतना चौधरी
टाकावे शब्दपटलावरी हे मानसरंग
मांडायला बसले असता मनी
थैमान करीत होते विचारतरंग ।।
माझ्या त्या विचारांतील स्वप्नाळू मासोळी
सांगू इच्छित होती मजला काहीशी
हवेत उंच भरारी घेऊन
जलाशयात होत होती नाहीशी ।।
माझ्या अंतर्मनाच्या सरितेला
हवी होती एकच वाट
जिच्या प्राप्तीसाठी ती
उसळत होती उंचच लाट ।।
पण माझ्या मानसतरंगांना
हळूच केले येथे बंद
ज्यांच्या निरस वातावरणी
मरून पडले मनातील कंद ।।
आता माझ्या मानसतरंगांची
मनीच होत आहे दगदग
मात्र तुम्हा अपरिचित राहील
माझ्या अग्निपंखांतील तगमग ।।
~ चेतना चौधरी
No comments:
Post a Comment