Saturday, 25 June 2016

वळण जीवनातील


एकदा सहज मागे वळले
जीवनाच्या वळणावरती
दिसले अपयशाचे एक घर
मोडक्या वीटा आणि माती ।।
भूतमय अपयशी घराच्या
होत्यात त्या वीटा लाल
ज्यांनी प्रत्येक वळणावर
केलेत माझे वाईट हाल ।।
आज मात्र सावरले
माझे मी पडते पाऊल
म्हणूनच आता लागतेय मज
माझ्या सुवर्ण यशाची चाहुल ।।
आता माझे यश बघून
पुन्हा येऊ बघताय वीटा
माझ्या शांत जीवनसागरात
उठवू बघताय संघर्ष लाटा ।।
येऊ देत देत कितीही
लाल वीटा आता दारी
मी मात्र चालत जाईल
माझ्या जीवनाची वारी ।।
~ चेतना चौधरी

No comments:

Post a Comment