Saturday, 25 June 2016

मनुष्य हा चुकांचा पुतळा

जीवनातील एक क्षण असे हसायचा 
एक क्षण मात्र असे रडायचा 
तरीही पैशासाठी होणारा वेडा 
मनुष्य जणू हा चुकांचा पुतळा ।।
मनी वसवूनी सुखदुःखाचा सागर 
जनी दाखवी हा आनंदाचा आगर 
असा मनातून फारच कोवळा 
मनुष्य जणू हा चुकांचा पुतळा ।।
साठवुनी घरी सोन्या चांदीचे अवशेष 
करवूनी घेतो जो स्वतःचा नामशेष 
असा समस्त जगातील खुळा 
मनुष्य जणू हा चुकांचा पुतळा ।।
पैशासाठीच हा राबराब राबतो 
करुनी मर्यादाउल्लंघन जीवालाही दाबतो 
अशा प्रकारे जीवनाला लावितो जो उतरती कळा 
मनुष्य जणू हा चुकांचा पुतळा ।।
समर्पित करुनी कविता ही देवाला 
सांगू इच्छितो  मी अवघ्या जगाला 
मी देखील तुमच्यापैकीच एक आगळा 
कारण मनुष्य हा चुकांचा पुतळा ।।
                                   ~ चेतना चौधरी 


No comments:

Post a Comment